30 जूनच्या आत कर्जमाफी नाही केली तर काय कराल ? बच्चु कडू यांचे उत्तर ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून, शेतकरी संघटनांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे सरकारला यावर ठोस पाऊले उचलणे भाग पडले आहे. सुरुवातीला टाळाटाळ करणारे सरकार आता कर्जमाफीसाठी सकारात्मक पाऊले उचलत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक विशेष समिती गठीत केली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सहकार विभागाने देखील कर्जमाफीसाठी कोणतीही रकमेची मर्यादा नसेल, असे स्पष्ट केले असून जिल्हा बँकांनी पात्र शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत ३० जून ही तारीख अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जर सरकारने या निश्चित केलेल्या वेळेत कर्जमाफीची अंमलबजावणी केली नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतील असा इशारा देण्यात आला आहे. सन्माननीय बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे की, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर १ जुलैपासून राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल. यामध्ये ‘रेल्वे रोको’ सारखी आंदोलने करून सरकारला धडा शिकवला जाईल. केवळ रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर गनिमी काव्याने देखील हे आंदोलन अधिक प्रभावी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे, जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांच्या शक्तीची जाणीव होईल.















