कमी दाबाचे क्षेत्र ; राज्यात कसे राहील हवामान… पहा रामचंद्र साबळे यांचा अंदाज

कमी दाबाचे क्षेत्र ; राज्यात कसे राहील हवामान… पहा रामचंद्र साबळे यांचा अंदाज ; डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात सध्या थंडीची तीव्रता कायम राहणार आहे. बुधवार दिनांक २४ डिसेंबर ते शनिवार २७ डिसेंबर या कालावधीत हवेचा दाब १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक राहील, ज्यामुळे किमान तापमानात झालेली घट आणि थंडीचा कडाका कायम राहील. २१ डिसेंबर रोजी उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र झाल्यानंतर आता सूर्याचे उत्तरायण सुरू झाले आहे. यानुसार उत्तर गोलार्धात दिवसाचा कालावधी हळूहळू वाढेल, मात्र उत्तरेकडून आणि ईशान्येकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जानेवारी अखेरपर्यंत राज्यात थंडीचा प्रभाव चांगला राहील.

ADS किंमत पहा ×

राज्याच्या काही भागात, विशेषतः धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. पुढील काही दिवसांत तापमान यापेक्षा जास्त घसरण्याची शक्यता कमी असली, तरी थंडीचा मुक्काम जानेवारी अखेरपर्यंत असेल. अवकाळी पावसाबाबत सध्या तरी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, कारण हवामान सध्या स्थिर आहे. हिंदी महासागरात येत्या आठ दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते बंगालच्या उपसागराच्या दिशेने जाईल, परंतु त्याचा महाराष्ट्राच्या हवामानावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment